याचं नव्या राज्यपालांना भान ठेवावं लागेल, काय दिला संजय राऊत यांनी सल्ला?

याचं नव्या राज्यपालांना भान ठेवावं लागेल, काय दिला संजय राऊत यांनी सल्ला?

| Updated on: Feb 12, 2023 | 12:07 PM

VIDEO | संजय राऊत यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना काय दिले सल्ले? बघा व्हिडीओ

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कधी नव्हे तर राज्यपालांच्या विरोधात जनतेने, राजकीय पक्षांनी, राज्यातल्या संघटनांनी भूमिका घेतली होती. राज्यपालांच्या विरोधात पहिल्यांदाच लोकं रस्त्यावर उतरले होते. राज्यपालांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिलं ते घटनाबाह्य होतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. इतकेच नाही तर त्यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांना काही सूचना दिल्या आहेत.

Published on: Feb 12, 2023 12:07 PM