कोण बावनकुळे? त्यांची XXX आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायची?, संजय राऊत यांचा हल्लाबोल

“कोण बावनकुळे? त्यांची XXX आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायची?”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 27, 2023 | 11:46 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. त्यावरुन आता खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केलाय.

नवी दिल्ली, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली. त्यावरुन आता खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, “कोण बावनकुळे? आपली लायकी आहे का उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची. आयत्या बिळावर रेघोट्या मारून काय टीका करताय तुम्ही. त्यांनी आधी स्वत:चा पक्ष काढावा मग मी स्वतः बावनकुळेंचा सत्कार करेल.”

Published on: Jul 27, 2023 11:46 AM