“…तर पंकजा मुंडे यांनी राजकारणातून संन्यास घ्यायला हवा”, संजय राऊत यांचा सल्ला
"भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे", असं पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे."मुंडे यांचं राजकारणात अस्तित्व राहू नये यासाठी भाजपचा हालचाली सुरु आहेत.
मुंबई : “भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे”, असं पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”मुंडे यांचं राजकारणात अस्तित्व राहू नये यासाठी भाजपचा हालचाली सुरु आहेत. परंतु आम्हाला मुंडे कुटुंबाविषयी कायम आस्था आणि प्रेम राहीलं. गोपीनाथ मुंडे असते, तर शिवसेना-भाजप युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आजचं चित्र दिसलं नसतं. पण गोपीनाथ मुंडे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची राजकारणात वाताहत केली जात आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातच्या प्रमुख लोकांनी हिंमतीनं, साहसानं निर्णय घेण्याची गरज असते. परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात. तरच तुम्ही राजकारणात टिकून राहू शकता. नाहीतर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. आमच्यावर अन्याय होतो आहे, अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

