मी बकरा नाही तर… नीलम गोऱ्हे यांच्या ‘त्या’ टीकेवर संजय राऊत यांचा पलटवार
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केला असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. या टीकेवर स्वतः संजय राऊत यांनीच पलटवार केला आहे. नीलम गोऱ्हे पक्षात आले, खा-खा खालं आणि ताट घेऊन त्या निघून गेल्या, ताटपण ठेवलं नाही
मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केला असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. या टीकेवर स्वतः संजय राऊत यांनीच पलटवार केला आहे. मी बकरा नव्हे वाघ आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष सोडून पळून गेल्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, मी बकरा, शेळी पळपुटा नाही, मी पक्षाशी इमानदार आहे, असे राऊत म्हणाले. तर माझं अख्ख आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेलं. जी आता माझ्याबद्दल बोलताय, ते कधी आले पक्षात? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचं नाव न घेता त्यांना केला. नीलम गोऱ्हे पक्षात आले, खा-खा खालं आणि ताट घेऊन त्या निघून गेल्या, ताटपण ठेवलं नाही. ताट, वाटी, चमचा सगळं सोबत घेऊन पळून गेल्या. बाळासाहेबांनी आम्हाला वाघासारखं बनवलं असल्याचेही राऊत म्हणाले.
Published on: Dec 08, 2023 09:59 PM
Latest Videos