Sanjay Raut LIVE | मविआ सरकारला धोका नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

| Updated on: Jul 14, 2021 | 12:26 PM

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारबाबत संजय राऊत यांनी पुन्हा एक विधान केले आहे.

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक चर्चांना उधान आले आहे. यावेळी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारबाबतही अनेक चर्चा होत आहेत. हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी विरोधी पक्ष करत असतानाच मविआ सरकारला कोणताही धोका नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय