आर्यन खान कुणाशी बोलला? संजय राऊतांकडून खळबळजनक व्हिडीओ शेअर
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. तर, या व्हिडीओत आर्यन खान नेमंक कुणासोबत बोलला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राऊत यांनी व्हिडीओ शेअर केल्यानं खळबळ उडाली आहे.
मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज सापडल्या प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबीनं ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक केली होती. तेव्हा पासून हे प्रकरण सातत्यानं चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपसत्र सुरु केलं होतं. एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साळी यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केलीय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. तर, या व्हिडीओत आर्यन खान नेमंक कुणासोबत बोलला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राऊत यांनी व्हिडीओ शेअर केल्यानं खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य

400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
