Saamana | …तरीही टांग उपर!, ‘सामना’तून विधानसभा निवडणुकावरुन भाजपवर निशाणा
गोव्यात , मणिपुरात, उत्तराखंडात निवडणुका रंगतदार होतील. "आम्हीच जिंकू,आपल्याला कोणाचे आव्हान नाही" असे फुगे कितीही फुगवले तरी प्रत्येक राज्यात भाजपला संघर्ष करावा लागत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवर सामनाच्या अग्रलेखात भाष्य केलं असून भाजपला काही सवाल केले आहेत. आज तरी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यात ‘कांटे की टक्कर स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाचा रस्ता मोकळा नाही. गोव्यात , मणिपुरात, उत्तराखंडात निवडणुका रंगतदार होतील. “आम्हीच जिंकू,आपल्याला कोणाचे आव्हान नाही” असे फुगे कितीही फुगवले तरी प्रत्येक राज्यात भाजपला संघर्ष करावा लागत आहे. पंजाबात भले काँग्रेससमोर अडचणींचा डोंगर आणि अंतर्गत वाद आहेत, पण पंजाबात भाजपला तिसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय. चित्र हे असे आहे. या उपरही कुणाला वाटत असेल की आमच्यासारखे आम्हीच, तर त्यास सोप्या भाषेत म्हणावे लागेल, “गिरे तो भी टांग उपर, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Published on: Jan 14, 2022 11:00 AM