Sanjay Raut | व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो, त्याला आम्ही लूट म्हणतो : संजय राऊत

| Updated on: Dec 02, 2021 | 11:33 AM

आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

शिवसेना खासदार संजय राऊतयांनी विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीका केली आहे. ममता बॅनर्जी आल्या मुंबई या उद्योगनगरीचं माहिती घेतली. मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत. ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचं आवाहन केलं त्यात काय चुकलं असं संजय राऊत म्हणाले. आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवलं.  आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवलं. आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत  काय ठेवलंय, अशी वक्तव्य केलं होतं, त्यावेळी भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’साठी मुंबईत रोड शो चालतो का?
Ratnagiri | अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका, मोहर गेले गळून