Sanjay Raut: राऊतांनी भाजपवर टीका, देशातील महागाईची मोदींना चिंता नाही

| Updated on: May 07, 2022 | 12:14 PM

Sanjay Raut: राऊत यांनी आपल्या ट्विटमधून घरगुती गॅस सिलिंडरचे दर शेअर केले आहेत.

मुंबई: देशात आज 50 रुपयांनी घरगुती गॅस ( gas cylinder) महागला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना एका सिलिंडरमागे आता जवळपास हजार रुपये मोजावे लागणार आहे. महागाईचा भडका उडाल्याने शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendra modi) टीका करून भाजपला डिवचले आहे. देशभरात महागाई वाढली आहे. त्यावर भाजपचं कोणीच कसं बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. पण देशातील महागाईची त्यांना चिंता नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Published on: May 07, 2022 12:08 PM
Nana Patole: ‘अमजद खान’ नावाने फोन टॅप, रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार
Vile Parle येथे LIC कार्यालयात भीषण आग