‘मोदी विश्वगुरू अन् पापुआ देशात त्यांचा जय’, सामनातून पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं
VIDEO | देशात हम करे सो कायदा... सामनातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
मुंबई : पापुआ देशात मोदींचा जय, इथे लोकशाहीच्या मुसक्याच बांधल्या, अशा आशयाचा मथळा वापरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. तर देशात हम करे सो कायदा सुरू असल्याचे म्हणत मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान झाल्याचा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे काम करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार बहाल केले आणि मोदी सरकारने त्या स्वातंत्र्याच्या मुसक्या बांधून सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला. मोदी विश्वगुरू आहेत. ‘पापुआ’ देशाचे पंतप्रधान त्यांच्या पाया पडतात, पण मोदींच्या देशात लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्याचे काय? पापुआच्या पंतप्रधानांनी त्यांना चरणस्पर्श केला. खरं तर त्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवे होते, असे म्हणत मोदी यांच्या पापुआ देशातील दौऱ्यावर सडकून टीका केली आहे.