गुवाहाटीला गेलेल्यांनी 'या' देशात जावं अन्..., संजय राऊत यांनी लगावला शिंदे गटाला खोचक टोला

गुवाहाटीला गेलेल्यांनी ‘या’ देशात जावं अन्…, संजय राऊत यांनी लगावला शिंदे गटाला खोचक टोला

| Updated on: May 22, 2023 | 1:42 PM

VIDEO | पंतप्रधान मोदी यांच्या पापुआ न्यू गिनी दौऱ्यावरून संजय राऊत यांचा टोला, बघा काय म्हणाले?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी चरण स्पर्श केले. त्याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जग आदर देत असल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही फोटो नीट आणि निरखून पाहा. तुम्हाला दिसून येईल तो चरण स्पर्श आहे की गुडघा स्पर्श? पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या समोर आले तर त्यांना आम्हीही वाकून नमस्कार करू. ते आमच्या पेक्षा वयाने मोठे आहेत. असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली. पापुआ न्यू गिनी या देशाची लोकसंख्या 60 लाख आहे. त्या देशात 850 भाषा आहेत. तो संपूर्ण आदिवासी भाग आहे. मागास भाग आहे. ज्या पंतप्रधानांनी मोदींना चरण स्पर्श केला, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. भ्रष्टाचार करणारे ते अर्थमंत्री होते. फरारही होते. त्यांनी चरणस्पर्श केला आनंदाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा, भूतप्रेत आणि जादूटोणा यामुळे तो देश प्रसिद्ध आहे. त्यांनी नमस्कार केला असेल आणि भाजपवाले डंका पिटत असेल तर त्यांना माझा नमस्कार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तर गुवाहीटीत गेलेल्यांनी तिकडे जायला हवं आणि काय रेडे कापयचे असतील तर तिकडे कापावे, असे म्हणत शिंदे गटाच्या गुवाहटीला गेलेल्या आमदारांना टोलाही त्यांनी लगावला.

Published on: May 22, 2023 01:42 PM