Sanjay Shirsat : येत्या 15 दिवसात राज्यातील राजकारणात भूकंप होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

Sanjay Shirsat : येत्या 15 दिवसात राज्यातील राजकारणात भूकंप होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Oct 23, 2023 | 5:29 PM

VIDEO | आमदार संजय शिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेतच दिले आहेत. येत्या 15 दिवसात तुम्हाला प्रचिती येईल असे म्हणत शिरसाट यांनी आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हाशिवाय कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही तर...

छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर 2023 | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेतच दिले आहेत. ठाकरे गटातील लोक आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या पक्षाबाबतच्या काहीही वावड्या उठवल्या जात आहेत. ठाकरे गटातील लोक आमच्याकडे येऊ नयेत आणि ते थांबावे, म्हणून अनेक बातम्या पसरत असतात, असे संजय शिरसाट यांनी म्हटले असून आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हा शिवाय कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही. याउलट ठाकरे गटातून जे येणार आहेत ते लवकरच आमच्या पक्षात येतील. ते सुद्धा आमच्याच चिन्हावर लढतील. याची प्रचिती तुम्हाला येत्या 15 दिवसात येईलच, अशी भविष्यवाणीच संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Published on: Oct 23, 2023 05:29 PM