‘शरद पवार यांच्या सारखा मोठा नेता मी नाही’, संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली. मात्र NCP अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईवर बोलणं टाळलं, यावर शिवेसेना आमदार संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? बघा व्हिडीओ
मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. या झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वाक्यातच उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, त्यावर मी उत्तर देणार नाही. दरम्यान, या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. शरद पवार आहे ते बारामती अॅग्रो प्लांटच्या कारवाईमध्ये नेमकं काय घडलं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचे पुढचे होणारे परिणाम त्यांना माहिती असल्याने त्यांनी या कारवाईवर माध्यमांनी विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता मी नाही, शरद पवार यांना कारवाईनंतर होणारे परिणाम माहिती आहे. त्या परिणामांची जाणीव असल्याने कदाचित त्यांनी यावर बोलणं टाळलं असावं, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.