“दलालाच्या तोंडी भाडोत्री शब्द शोभत नाही”, शिवसेनेच्या नेत्याचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंचं सैन्य हे भाडोत्री सैन्य आहे. ते भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार, हे कोणाचे नसतात. हे बाजारबुणगे आहेत," अशी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानानंतर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.
औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंचं सैन्य हे भाडोत्री सैन्य आहे. ते भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार, हे कोणाचे नसतात. हे बाजारबुणगे आहेत,” अशी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या या विधानानंतर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. “संजय राऊत रोज वेगवेगळे स्टेटमेंट देत असतात, परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना सिरियसली घेत नाही. मी संजय शिरसाट हा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, तर संजय राऊत हा शरद पवारचा दलाल आहे. या दलालांनी उद्धव ठाकरे गट संपूर्ण संपवला आहे. संजय राऊत यांचे कामच आहे, जो चांगलं काम करतो त्याला डिस्टर्ब करणे.संजय राऊत यांच्यामध्ये सरकार उलथवण्याची ताकद नाही. ज्यांची रोजी रोटी खाल्ली त्याला संपवण्याचे काम संजय राऊत यांनी केले.आम्ही भाडोत्री आहोत. हे दलालांच्या तोंडी शोभत नाही, दलाल असलेल्या माणसाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असं संजय शिरसाट म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

