“संजय राऊत हे दुसऱ्याचं घर जळताना आनंद घेणारी औलाद”, शिवसेना आमदाराची जहरी टीका
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: राज्यातील सत्तानाट्यानंतर नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी काल अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “शिंदेंप्रमाणेच आता अजित पवार गटाचंही हायकमांड दिल्लीत,” असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत हे दुसऱ्याचं घर जळत असताना आनंद व्यक्त करणाऱ्यांची औलाद”, असल्याची जहरी टीका संजय शिरसाट यांनी केली.
Published on: Jul 13, 2023 01:04 PM
Latest Videos