कोल्हापुरातल्या दंगलीवरून संजय शिरसाट संजय राऊत यांच्यावर भडकले; म्हणाले, “दंगल घडवणारे…”
देशात आणि राज्यात झालेल्या दंगलीवरून मविआने शिंदे फडणवीस आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "दंगल घडत नाही, जे दंगल घडवत आहेत, त्यांना नीट करायचं काम सरकार करत आहे.
कोल्हापूर : देशात आणि राज्यात झालेल्या दंगलीवरून मविआने शिंदे फडणवीस आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दंगल घडत नाही, जे दंगल घडवत आहेत, त्यांना नीट करायचं काम सरकार करत आहे. गेल्या अडीच वर्षात जे सरकार झोपलं होतं, त्यामुळे ज्या लोकांना माज आला आहे. ज्या लोकांना वाटायचं औरंगजेब, टिपू सुलतान त्यांचा बाप आहे, त्यांना चोख उत्तर द्यायचा काम सरकार करत आहे. आम्हाला दंगली नको. ज्याला वाटतंय औरंगजेब त्यांचा बाप आहे, त्यांनी त्याचे पूजन करावे. हिंदू धर्मांच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल. दंगल कोण घडवत आहे, याच्या खोलात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जात आहे. काही दिवसात समजेल दंगल घडवणारे कोणत्या पक्ष्याचे आहेत.कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराज यांच्या संस्कारात वाढलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला शांततेचे प्रतीक मानले जाते, पण कोण दंगल घडवत आहे? का यांना औरंगजेबाचा पुळका येत आहे? पण दंगलखोरांना आम्ही सोडणार नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.