मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी सांगितला दिवस

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी सांगितला दिवस

| Updated on: Jul 13, 2023 | 12:08 PM

मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे अजित पवार यांची नाराज असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही खातेवाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं समजलं जातंय. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असल्याची आशा सर्वांना होती, मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळविस्ताराच्या संदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे अजित पवार यांची नाराज असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही खातेवाटपासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं समजलं जातंय. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होणार आहे.” खाते वाटपासंदर्भातही संजय शिरसाट यांनी महत्वाचं विधान केलं आहे, यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jul 13, 2023 12:08 PM