संजय राऊत यांनी स्वत:ची लायकी ओळखावी; अरेतुरेची भाषा वापरत शिंदेगटातील नेत्याची जहरी टीका
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा काय म्हणालेत....
शिंदेगटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना शिरसाट यांनी अरेतुरेची भाषा वापरली आहे. “संजय राऊतला कल्याण-डोंबिवलीबद्दल काय माहिती आहे. ज्याला काही माहितीच नाहीये. तो कशावरही उगाच बोलतो. याच कारणामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्याची त्याला जागा दाखवली. आतातरी संजय राऊतनं सुधारलं पाहिजे. जे कालपर्यंत तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचे ते आता तुम्हाला ओळख दाखवत नाहीत. संजय राऊत यांनी स्वत:ची लायकी ओळखून बोलावं”, असं संजय शिरसाट म्हणालेत.
Published on: Jan 28, 2023 01:05 PM
Latest Videos