Sanjay Shirsat : … तर काय फरक पडतो? रावण दहनाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा विरोधकांवर हल्लाबोल
VIDEO | शिंदे गटाचा मेळावा यंदा आझाद मैदानावर असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन करण्याचं फर्मान राज्य सरकारने काढल्याची टीका विरोधकांकडून होतेय, तर याला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात येतोय. यावरच संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलेत.
संभाजीनगर, २१ ऑक्टोबर २०२३ | दसरा मेळावा दरवर्षी हा ठरल्याप्रमाणे शिवाजी पार्कवर होणार होता. मात्र दोन गटात भांडण नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदान निवडले. रामलीलांच्या आयोजकांना एक दिवस अगोदर रावण दहन करायला सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली असेल आणि त्यानंतर निर्णय घेतला असेल. आता काही लोकांना राम आणि रावणाबद्दलचा लळा दिसतोय. तर आम्ही याला विरोध करत आहेत. रामाने त्यांना सुबुद्धी दिली आहे, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली. तर वाल्याचा वाल्मिकी नवीन रामायण लिहतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. बाळासाहबे ठाकरे यांच्या तालमीत एकनाथ शिंदे वाढले आहेत. तर ते तुम्हाला वाल्या कोळी वाटत असतील तर तुम्हाला शिवसैनिक माफ करणार नाही. ही टीका मुख्यमंत्र्यांवर नाही तर बाळसाहेबांवर आहे. म्हणून रावण दहन एक दिवस आधी झालं तर किंवा ३६५ दिवस झालं तरी काय फरक पडतो? राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.