घान्याऐवजी ठाण्याला जाऊन प्रवचनं द्या; संजय राऊत यांच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी फटकारलं
VIDEO | संजय राऊत यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा, केलेल्या टीकेवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं राऊतांवर टीकास्त्र, म्हणाले, 'संजय राऊत यांनाच मातोश्रीवरून भिवंडीला जावं लागणार'
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | घाना दौऱ्यावरून विधानसभा अद्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अध्यक्ष वेळकाढूपणा करतात यात नवीन काय. ते एक वर्षापासून वेळकाढूपणा करत आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली आहे. पण आमचे स्पीकर साहेब लोकशाही वाऱ्यावर सोडून घानाला चालले होते. आम्ही विरोध केला. मला असं कळलंय त्याांचा दौरा रद्द झाला, असं राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच फटकारले आहे. ‘संजय राऊत यांना दिवसा-ढवळ्या स्वप्न पडायला लागली आहे. अशी अनेक वक्तव्य त्यांनी केली. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार पडणार असेही ते म्हणाले. मात्र आता त्यांचेच आमदार अपात्र होणार आणि संजय राऊत यांनाच मातोश्रीवरून भिवंडीला जावं लागणार’, असे शिरसाट म्हणाले.