Sanjay Shirsat : ‘ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, जर झालीच तर आत्महत्या…’ राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवर शिरसाटांचा घणाघात
'राज ठाकरे कितीही म्हणाले एकत्र यावं, तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार नाही. कोणाला धरायचं आणि कोणाला सोडायचं या द्विधा मनःस्थितीत ठाकरे गट आजही आहे. आता जर ही युती सोडली तर शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यासारखं होईल त्यामुळे युतीही नको आणि पिछेहाटही नको. अशा भूमिकेत ते आहेत', असं स्पष्ट शिरसाट म्हणाले.
उबाठाला त्यांच्याजवळ असणारं कार्यक्षेत्र सोडण्याची इच्छा नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या बुडाला जी आग लावली होती त्याचा धूर अजून निघतोय. राऊतांनी एक व्यंगचित्र पोस्ट करून दाखवून दिलं की त्यांची आग अजून विझलेली नाही. आता ही नवी युती आम्हाला नको’, असं म्हणत शिरसाटांनी ठकारेंवर निशाणा साधला. तर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र यायला हवे, असं राज ठाकरे म्हणाले यावर शिरसाट यांनी भाष्य करताना म्हटले की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची हाक दिली. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे यांचा काय संदेश आहे हे कळते. याची जाणीव आहे. आम्हाला त्यांच्या संदेश न समजायला दूधखुळे नाहीत. तुम्ही युती करा. आत्महत्या करण्याची वेळ कुणावर येणार आहे, हे कळेल. हे चांडाळ चौकडी लोक कधीच युती होऊ देणार नाही. राजकीय जीवनातील अनुभवावरून सांगतोय, युती झाल्यास अस्तित्व संपेल ही भीती आहे, असं शिरसाट म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
