अंधारे यांना मारहाण, संजय शिरसाट यांना वाटलं वाईट, नेमकं कारण काय?

अंधारे यांना मारहाण, संजय शिरसाट यांना वाटलं वाईट, नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 02, 2023 | 11:44 AM

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी अंधारे यांचा उल्लेख 'ऍक्टर' असा केला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विकायला काढल्याने आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला. पण हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उठली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी अंधारे यांचा उल्लेख ‘ऍक्टर’ असा केला आहे.’इतक्या मोठ्या ऍक्टरवर मारहाण झाली मला वाईट वाटतं.एखाद्या महिलेवर हात टाकण्यापर्यंत मजल जाते म्हणजे तेव्हा त्या महिलेने मर्यादा सोडलेली असते.ज्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहबे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतलं. महिलेवर हात उचलणं हे चुकीचं आहे, पण महिलेने पण मर्यादा सांभाळली पाहिजे.उद्धव ठाकरे यांनी आता तरी डोळे उघडले पाहिजे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे शिवसेना डुबवल्याशिवाय राहणार नाही’, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

 

Published on: May 19, 2023 03:35 PM