वारकऱ्यावरील हल्ल्यावरून राऊत यांनी सरकारलं घेरलं; पोलीसांवर टीका करत म्हणाले, ‘अंगात काय औरंग्या…?’
इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं. त्यावरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर यावरून सरकारवर टीका होताना दिसत आहे.
मुंबई : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्याला काल गालबोट लागणारा प्रकार झाला. इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं. त्यावरून आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर यावरून सरकारवर टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी, महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली हे आम्ही काल पाहिले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. बेदमपणे वारकऱ्यांना लाठिचार्ज होताना पाहिलं, ते कोणी नाकारु शकत नाही असं म्हटलं आहे. तर जगात वारीचा सन्मान केला जातो. ही सत्तेची मस्ती आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. टोळ्या पाळल्यात आणि त्या तिकडे तणाव निर्माण करतात. काल घडलेल्या घडनेचं कोण प्रायश्चित घेणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कालच्या वारकरी लाठीचार्ज घटनेसाठी माफी मागावी लागेल. आता मुख्यमंत्री कुठे, हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे कुठे गप्प बसले आहेत. वारकऱ्यांची माफी मागितल्या शिवाय मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरला पूजेला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटलं आहे.