Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल

Santosh Deshmukh Case : धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल

| Updated on: Apr 02, 2025 | 3:09 PM

Dhananjay Deshmukh - DCM Ajit Pawar Meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान धनंजय देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली आहे.

धनंजय देशमुख हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज धनंजय देशमुख यांनी अजितदादांची भेट घेतली आहे. त्यांच्यात काय चर्चा होते ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Apr 02, 2025 03:09 PM