Santosh Deshmukh Case : ‘निर्घृण हत्येनंतर झाडाझुडपातील हत्यारं…’, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याने आज सकाळी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 'मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली', असं सुदर्शन घुलेने म्हटलं त्यानंतर देशमुख प्रकरणातील आणखी एक पुरावा समोर आलाय.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा पुरावा समोर आला आहे. संतोष हत्या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुलेचा पंचनामा टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. यामध्ये प्रतिक घुलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. टाकळी चिंचोली परिसरातील शिव रस्त्यावर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. ही जागा प्रतिक घुले याने दाखवली. इतकंच नाहीतर संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारं त्याने झाडाझुडपात लपवल्याचे सांगितले. तर संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर झाडाझुडपात लपवलेले हत्यारं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं होतं. त्यानंतर प्रतिक घुलेने आपला कबुली जबाब दिला आहे.