Santosh Deshmukh Case : ‘मीच अपहरण केलं अन् हत्या…’, पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. यामुळे आता याप्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. तर इतर आरोपी पोलीस कोठडीत असताना आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे. आरोपी सुदर्शन घुले याने दिलेल्या जबाबानंतर आरोपीला शिक्षा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण या प्रकऱणातील आरोपीने स्वतःहून दिलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या आरोपींकडून सरपंच संतोष देशमुख यांनी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. अशातच देशमुख कुटुंबीय आम्हाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर आरोपींच्या या कबुली जबाबानंतर आरोपींना मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे.

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
