Anjali Damania : कराड राजकारण्यांचा लाडका, स्पेशल ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप, आता दमानियांची मोठी मागणी काय?
वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचे वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा त्याची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक काल रात्री बिघडल्याची माहिती समोर आली. यानंतर त्याला बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी काही तपासण्या करण्यात आल्यात. सध्या प्रकृती स्थिर असून काही रिपोर्ट आज येणं अपेक्षित असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप करत याबाबतची शंका उपस्थित केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या ज्यावेळी बीडच्या कारागृहात काही कैद्यांची मारामारी झाली तेव्हा इतर कैद्यांना हलवण्यात आलं. कराडला कधीच हलवलं नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा राजकारण्यांचा लाडका असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे माझी पहिल्या दिवसापासून एकच मागणी होती की, वाल्मिक कराडला आर्थर किंवा येरवडा जेलमध्ये हलवा. त्याला स्पेशल ट्रिटमेंट का दिली जातेय आणि कराडला बीडमध्ये ठेवायची गरज काय?’ असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?

हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'

युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
