Koyna Dam Earthquake : महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असणाऱ्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
त्यामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. पहाटे जाणवलेला भूकंपाचा धक्का हा पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा असल्याचे कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी सांगितले आहे.
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (Koyna Dam) परिसरात वारंवारं भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज पहाटेही धरण परिसरात भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. पहाटे जाणवलेला भूकंपाचा धक्का हा पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा असल्याचे कोयना सिंचन विभाग (Koyna Irrigation Division) कोयनानगर यांनी सांगितले आहे. तर कोयनेपासून उत्तरेस 5 किमी अतंरावर भूकंपाचा धक्का जाणवला. केंद्र बिंदू 30 किमी खोलवर असल्याची माहितीही विभागाने दिली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही वित्तहानी झालेली नाही. मात्र घराचे पत्रे हलत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं.
Latest Videos