Jalna Maratha Protest | जालनातील ‘त्या’ घटनेनंतर विरोधकांच्या आरोपांवर Shivendraraje Bhosale स्पष्टच म्हणाले…
VIDEO | जालन्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर राज्यात एकच गदारोळी, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बंदची हाक, शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा बांधवाना काय केलं आवाहन?
सातारा, २ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला पोलिसांकडून लाठीचार्ज या घटनेवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार असतो. शासनच लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हे माध्यम असते. कुठल्याही आंदोलकांवर लाठी चार्ज होणं योग्य नाहीच. शासन आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं आणि कोर्टात टिकलं पण फडणवीस यांचा पायउतार झाल्यावर आरक्षण कोर्टातून गेलं. तर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी घटना त्याची चौकशी झालीच पाहिजे. कुणाच्या चुका झाल्या असतील त्यांना शिक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होईल. मराठा बांधवांनी संयम बाळगला पाहिजे, लाखोंचे मोर्चे आपण शांततेच्या मार्गाने काढले पण कोणता ही अनुचित प्रकार घडला नाही. यापुढे ही हिंसक होऊ नये ही विनंती. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी कायम मराठा बांधवांच्या बरोबर आहे. ही न्यायालयीन लढाऊ आपण जिंकुच आपल गेलेलं आरक्षण आपल्याला परत मिळेल, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी करत विश्वासही व्यक्त केला आहे.