गुवाहाटी आणि सुरतला शिंदेगटाची शाखा काढायला गेला होता का? सुषमा अंधारे यांचा सवाल
शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. पाहा काय म्हणाल्यात...
सातारा : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. काल महाप्रबोधन यात्रा साताऱ्यात होती. यात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. गुवाहाटी आणि सुरतला शिंदेगटाची शाखा काढायला गेला होता का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. आपल्या देशात गायीचं रक्षण होतंय. पण बाईला संरक्षण नाही. गायीला मिठी मारण्याचा निर्णय हा काय निर्णय आहे का?, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. इलाका तुम्हारा हैं, लेकिन धमाका हमारा होगा!, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शंभुराज देसाईंना आव्हान दिलंय.
Latest Videos