विजय झालाच पण बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक आमची मतं; सत्यजित तांबे यांचा दावा
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली. 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली. महाविकास आघाडी विरूद्ध सत्यजित तांबे अशा या लढाईत सत्यजित तांबे यांनी बाजी मारली. मविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. तर 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजयी झाले. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय झालाच पण बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक आमची मतं आहेत, असं ते म्हणाले.मानस पगार माझा सहकारी होता. मानसला युवक काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्याच्या जाण्याने आम्ही सर्वचजण दु:खात आहोत. अशा दु:खाच्या प्रसंगी सेलिब्रेशन करणं योग्य नाही. त्यामुळे कुठलाही आनंदोत्सव साजरा होणार नाही. 3 आणि 7 फेब्रुवारीला मी सर्वाना भेटेन, असं सत्यजित म्हणाले.
Latest Videos