सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 16 अर्ज; वर्षभरापासून रिक्त पदावर कुणाची वर्णी लागणार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 16 अर्ज; वर्षभरापासून रिक्त पदावर कुणाची वर्णी लागणार?

| Updated on: Apr 01, 2023 | 8:26 AM

Savitribai Phule Pune University Vice-Chancellor : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद मागच्या वर्षभरापासून रिक्त आहे. आता या पदी कुणाची वर्णी लागणार याची सध्या चर्चा होतेय. पाहा व्हीडिओ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 16 जणांनी अर्ज केला आहे. गेल्या एक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद रिक्त आहे. आता या पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याच महिन्यात त्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी काळात राज्यपाल कायद्यातील बदलाला स्थगिती दिल्यानं कुलगुरू निवड रखडल्या होत्या. आता मात्र या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडत आहे. 30 तारखेला अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. या दिवसापर्यंत 16 जणांनी अर्ज दाखल केला आहे.

Published on: Apr 01, 2023 08:25 AM