तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काय केलं मोठं वक्तव्य?
VIDEO | संभाजीनगरमधील दंगल भडकली की भडकवली याबाबत शंका घेण्यास जागा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले...
अहमदनगर : कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. तर कोर्ट या संदर्भात योग्य निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र केलं तर या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील वादावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच गृह खात्यावरही निशाणा साधला आहे. या शिवाय संभाजी नगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचंही म्हटलं आहे. या सभेसाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. या सभेला मोठी गर्दी होणार आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.