Pravin Darekar | विरोधक भांबावलेल्या अवस्थेत, म्हणुनच ते पायऱ्यांवर मारामाऱ्या - tv9

Pravin Darekar | विरोधक भांबावलेल्या अवस्थेत, म्हणुनच ते पायऱ्यांवर मारामाऱ्या – tv9

| Updated on: Aug 25, 2022 | 11:32 AM

शिंदे हे आत्ताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना जरा काम करू द्या, दोन महिने झाले नाहीत तर एवढं पण काही होण्याचं काम नाही. थोडासा संयम बाळगा. तर तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं काय दिवे लावले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे, असेही दरेकर म्हणाले.

अधिवेशनचा शेवटचा दिवस असून विरोधकांनी दिलेल्या घोषणाबाजीवर आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली. तसेच ते म्हणाले विरोधकांचा डान्सबारवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्यांच पितळ घडल पाडल्यानेच ते भांबावलेल्या अवस्थेत आहेत. आणि म्हणुनच ते पायऱ्यांवर मारामाऱ्या करत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिंदे यांच्यावरील कंत्राटी मुख्यमंत्री अशा टीकेला उत्तर देताना, दरेकर म्हणाले, इतक्या खालच्या दर्जाची टीका मुख्यमंत्री असणाऱ्या माणसावर करणे चुकीचे आहे. तर शिंदे हे आत्ताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना जरा काम करू द्या, दोन महिने झाले नाहीत तर एवढं पण काही होण्याचं काम नाही. थोडासा संयम बाळगा. तर तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं काय दिवे लावले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे, असेही दरेकर म्हणाले.