गुवाहटीच्या ‘त्या’ टीकेवरून शहाजी बापूंनी संजय राऊत यांना फटकारलं, म्हणाले…
VIDEO | संजय राऊत यांनी केलेल्या गुवाहटीच्या 'त्या' टीकेवर शहाजी बापू पाटील यांचं प्रत्युत्तर
मुंबई : गुवाहीटीत गेलेल्यांनी तिकडे पापुआ न्यू गिनी या देशाला जायला हवं आणि काय रेडे कापयचे असतील तर तिकडे कापावे, असे म्हणत शिंदे गटाच्या गुवाहटीला गेलेल्या आमदारांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या गुवाहटीच्या या टीकेवर शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनाच खरंतर जादूटोणाची गरज लागते की काय असा आम्हाला वाटू लागलेलं आहे. आणि संजय राऊत यांनाच जादूटोणावर विश्वास आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही गुवाहाटीला पूजेसाठी गेलो होतो जादूटोणासाठी नाही, संजय राऊत काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याइतके ते मोठे नाहीत, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. आपल्या संस्कृतीत मोठ्या, वयस्कर माणसांना चरणस्पर्श करून नमस्कार करणे हा टीकेचा विषय होऊ शकत नाही. इथे संजय राऊतच संस्कृती सोडून बोलत असल्याची टीका शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांनी केली.

पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?

युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश

राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?

'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
