Shahid Afridi : ‘स्वतःच लोकांना मारतात आणि…’, ‘पहलगाम’वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदी बरळल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय दु:खी असून तीव्र संताप व्यक्त करत आहे. तर जगभरातील लोकांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. असे असताना मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निर्लज्जपणाची पातळीच ओलांडली असल्याचे पाहायला मिळतंय. शाहिद आफ्रिदीने या हल्ल्यावर लाजिरवाणे वक्तव्य करत त्याने भारतावर गंभीर आरोप केला आहे. भारत आपल्याच लोकांना मारण्याचे काम करतो आणि पाकिस्तानवर आरोप करतो, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलंय. इतकंच नाहीतर अमेरिका आणि ब्रिटनसह इतर देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. असे असतानाही पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले असून गरळ ओकली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, शाहिद आफ्रिदी बरळल्यानंतर असुद्दीन ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘शाहिद आफ्रिदी कोण आहे? तो तर एक जोकर आहे’, असं असुद्दीन ओवैसींनी म्हटलंय.