Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंच्या टीकेला शंभूराज देसाईंचं सडेतोड प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंनाच केले सवाल

| Updated on: Jul 27, 2022 | 11:58 AM

पक्षप्रमुख कसे मुख्यमंत्री झाले? शंभुराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच हा सवाल केलायं. इतके नाही तर दाऊदशी संबंध असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत मांडीला मांडी लावून आम्हाला बसवण्यात आल्याचाही आरोप.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आणि टीकाही सुरू झाल्या आहेत. यावरुन शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. शंभूराज देसाई यांनी बोलताना एक अत्यंत मोठा प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मग पक्षप्रमुख कसे मुख्यमंत्री झाले? शंभुराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच हा सवाल केलायं. इतके नाही तर दाऊदशी संबंध असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत मांडीला मांडी लावून आम्हाला बसवण्यात आल्याचा देखील आरोप देसाईंनी केल्याने राजकाय वर्तुळात एकच खळबळ उडालीयं. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे नैराश्यात गेल्याचे देसाईंनी म्हटले आहे. आता शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पालापाचोळा, गद्दार ते विश्वासघातकी असे अनेक आरोप बंडखोर आमदार तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरती करण्यात आले आहेत.

Published on: Jul 27, 2022 11:31 AM
Shambhuraj Desai : चर्चा होती मग कुठे कांडी फिरली? शंभूराज देसाईंचा ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन सवाल
Video : औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू