Eknath Khadse : झुलवत ठेवायचं ही तर त्यांची जुनी रीत, एकनाथ खडसे यांचा कुणावर हल्लाबोल?
VIDEO | 'खोटे आश्वासन देऊन मराठा समाजाला झुलवत ठेवायचं आणि आंदोलन दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रित', असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ खडसे यांनी सडकून टीका केली आहे. तर मराठा आंदोलनाचा परिणाम उद्याच्या राजकारणावर होणार, असेही ते म्हणाले.
जळगाव, २१ ऑक्टोबर २०२३ | देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या कालखंडात म्हटलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळाला नाही तर मी स्वस्त बसणार नाही. राजकारणातून संन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं, अशी त्यांची एक चित्रफीत व्हायरल होत आहे. तर मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते त्यावेळेस गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना 40 दिवसात आरक्षण देऊ असे आश्वासन दिले. खोटे आश्वासन देऊन मराठा समाजाला झुलवत ठेवायचं आणि आंदोलन दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रित असल्याची खोचक टीका एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केली. तर जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा विधानसभा यावर होणार असल्याचेही खडसे यांनी म्हटले. जरांगे पाटील यांचे सध्याचे आंदोलन हे राजकारणाच्या पलीकडे असलं तरी उद्याच्या राजकारणावर याचा दुर्गामी परिणाम होणार असल्याचे सूचक वक्तव्यही खडसे यांनी केले.