Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका; म्हणाल्या, पार्ट टाईम उपमुख्यमंत्री…
VIDEO | राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केलीय
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून त्यांनी आंदोलनं देखील सुरू केलेत. अशातच कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे पार्ट टाईम उपमुख्यमंत्री असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी करत फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सध्या ५० खोक्यांचं हे भ्रष्टाचारी सरकार आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या दबावामुळे त्यांनी कंत्राटी भरतीचा असलेला जीआर रद्द केला आहे. नाहीतर तो रद्द केला नसता, २०११ ते २०२१ या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे फुल टाईम मुख्यमंत्री होते मात्र आता ते पार्ट टाईम उपमुख्यमंत्री आहेत. ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते तेव्हा का त्यांनी या जीआरमध्ये बदल केला?’, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.