राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं घडतंय तरी काय? शरद पवार गट निवडणूक आयोगात उत्तर सादर करणार नाही?
VIDEO | उद्यापर्यंत उत्तर सादर करण्यासाठी दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून शेवटची मुदत, पण शरद पवार गट उत्तर सादर करणार नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नेमकी खेळी काय?
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्या गटाला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षावर दावा सांगण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यक माहितीची मागणी केली होती. याकरता दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. आणि ही मुदत उद्या संपवणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांना उद्या उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. मात्र अशातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार यांचा गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. मात्र यावर निवडणूक आयोगाचं उत्तर आलेलं नाही. पण निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उद्यापर्यंत उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.