शरद पवारांचा पलटवार !
शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज यांच्या या आरोपावर शरद पवार यांनीही जोरदार पलटवार केलाय. काही लोक जात आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्हाला नकोय.
पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण (Politics)पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तिनही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज यांच्या या आरोपावर शरद पवार यांनीही जोरदार पलटवार केलाय. काही लोक जात आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्हाला नकोय. आम्हाला धार्मिक वाद नको, विकास हवा, महागाईपासून मुक्तता हवी असल्याचं सांगत पवार यांनी राज ठाकरे आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधलाय. पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)बोलत होते.