रामाबद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर खेद; बघा जितेंद्र आव्हाड यांची UNCUT पत्रकार परिषद
राम बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते. रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. राम १४ वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार? असं वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : राम बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते. रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. राम १४ वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार? असं वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड देखील उठवण्यात आली. दरम्यान, काल प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आज पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी खेद व्यक्त करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी महाराष्ट्राला संबोधित करत असतो आणि मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण काल प्रभू श्रीरामांबद्दल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. तर कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही. राम हा बहुजनाचा आहे आणि आमचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. मात्र आत्ता निवडणुकीकरिता फक्त राम हवा आहे, असेही विरोधकांना आव्हाडांनी म्हटले.