अजित पवार पुन्हा नाराज? अजितदादा गटातील नाराजीचं रोहित पवार यांनी सांगितलं कारण
'अमित शाह आणि अजित पवार यांची भेट ही सदिच्छा भेट असू शकते. किंवा काही गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे भाजप काम करत नाही. जे काही मदत भाजपकडून होणार होती. मात्र ती झाली नसावी, त्यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे.', रोहित पवार यांनी केला थेट दावा
मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | भाजप ठरल्याप्रमाणे वागत नसल्याने अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर रोहित पवार यांनी हा दावा केलाय. रोहित पवार म्हणाले, अमित शाह आणि अजित पवार यांची भेट ही सदिच्छा भेट असू शकते. किंवा काही गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे भाजप काम करत नाही. जे काही मदत भाजपकडून होणार होती. मात्र ती झाली नसावी, त्यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे. तर यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत म्हणाले, कोणताही आमदार नेता नाराज असेल मला वाटत नाही. कुठेतरी महायुतीबद्दल संभ्रम आणि गैरसमज निर्माण करावा, असे बालिश काही लोकं वागत आहे.
Published on: Nov 13, 2023 06:16 PM
Latest Videos