‘नया है वह…’, जितेंद्र आव्हाड आणि नितेश राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्…
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानभवनातील सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तर सत्ताधारी आणि विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने देखील आलेत.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधानभवन परिसरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे नेते, मंत्री नितेश राणे यांची आज भेट झाल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात देत हस्तांदोलन केल्याचे दिसले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आधीपासून उभे होते. त्यानंतर नितेश राणे हे समोरून आले. यावेळी दोघेही आमने-सामने आल्यानंतर त्यांनी एकमेकांना बघून स्माईल दिली आणि नंतर हस्तांदोलन केलं. त्यांच्या काहीतरी संवाद देखील झाला. मात्र नेमकं काय दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झालं हे समोर आले नाही. दरम्यान, आजच विधानभवनाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांसह समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?

ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी

हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात

पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
