Special Report | शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य कर्नाटक निकालावर? काय आहे कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचा दावा?
सरोदेंनी येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं म्हटलंय.
मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू झाले आहे. अशातच राज्यात राजकीय भूकंप होणारच असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. तर या दाव्याचा थेट संबंध हा राष्ट्रवादीतील सुरू असलेलं सध्याच नाट्य आणि येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी लावला जात आहे. सरोदेंनी येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. कर्नाटक निकवडणुकीचा हा 11 ताखेला येणार आहे. त्यानंतर राज्यातील समिकरणं बदलू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार का? उद्धव ठाकरे यांना न्यायदेवता पावणार? काय असणार चित्र राज्यात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट