विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार? 'मविआ'चे 'हे' 3 फॉर्म्युले तयार

विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार? ‘मविआ’चे ‘हे’ 3 फॉर्म्युले तयार

| Updated on: Jun 18, 2024 | 11:00 AM

आता मविआची 3 फॉर्म्युले तयार असून त्यांचीच सध्या चर्चा होतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे आणि शिवसेनेला स्पष्ट मेसेज देण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसला अधिक जागा देण्यात आल्यात त्यामुळे विधानसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाव्यात.

विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मविआची प्राथमिक चर्चा झाली. आता मविआची 3 फॉर्म्युले तयार असून त्यांचीच सध्या चर्चा होतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे आणि शिवसेनेला स्पष्ट मेसेज देण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसला अधिक जागा देण्यात आल्यात त्यामुळे विधानसभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाव्यात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या २८८ जागेपैकी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ९६ समसमान जागांचा फॉर्म्युला चर्चेत आहे. तर दुसरा फॉर्म्युला असा आहे की, विधानसभेच्या २८८ जागेपैकी काँग्रेसला ९६-१०० जागा, ठाकरे गट ९६-१०० जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ९०-९६ जागा…तर तिसऱ्या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेस आणि ठाकरे गट १०० जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ८८ जागा… त्यामुळे आता नेमका कोणता फॉर्म्युला ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Jun 18, 2024 11:00 AM