भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा, शरद पवार म्हणाले, ‘याची’ चौकशी करा…
भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
वर्धा : भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राची सुटका झाली. हा निर्णय आधीच व्हायला हवा होता. पण आता तो निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाल्याचं पाहिलं नव्हतं. पण आता राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. याचं समाधान आहे, असं पवार म्हणालेत. कोश्यारी यांच्या काळात जे जे संविधानाच्या विरूद्ध घडलं असेल, त्याची चौकशी व्हावी, असंही पवार म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 11:38 AM
Latest Videos