केसीआर राव यांना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळेल? शरद पवार स्पष्टच बोलले...

केसीआर राव यांना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळेल? शरद पवार स्पष्टच बोलले…

| Updated on: Jun 26, 2023 | 12:57 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाष्य केलं आहे. राजकीय अजेंड्यासाठी हैदराबादमध्ये कांद्याला दर मिळतोय.काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची फजिती झाली, असं शरद पवार म्हणाले.

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून भाष्य केलं आहे. “चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न हाती घेतला आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पिक कुठे आहे? विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात कांदा पिक घेतलं जात नाही. नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात कांदा पिक घेतलं जातं. त्यांच्यासाठी हे पिक महत्त्वाचं आहे. पण मला माहिती अशी मिळाली काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची फजिती झाली हे पाहा. त्यामुळे हे एक राजकीयदृष्ट्या एक वेगळा चित्र आपण दाखवू शकतो हा प्रयत्न याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये वेगळं काही नाही.केसीआर यांची महाराष्ट्रातील ताकद किती हे निवडणुकीनंतरच कळेल.”

 

Published on: Jun 26, 2023 12:57 PM