राष्ट्रवादीच्या समितीची अध्यक्ष निवडीबाबत उद्या बैठक, यापूर्वीच शरद पवार यांची मोठी सूचना
VIDEO | राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीच्या समितीसंदर्भात शरद पवार यांची मोठी सूचना, उद्याच्या या बैठकीपूर्वीच पवारांनी काय दिल्या सूचना?
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व्यथित होऊन शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसतेय. अशातच राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीच्या समितीत खडसे यांचा समावेश करा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा एकनाथ खडसे यांना फोन गेला आणि त्यांना तात्काळ मुंबईत बोलावण्यात आले. हा फोन गेल्यानंतर एकनाथ खडसे हे जळगाव नंतर मुंबईकडे लगेच रवानाही झालेत. दरम्यान उद्या राष्ट्रवादीच्या समितीची अध्यक्ष निवडीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच अध्यक्ष निवडीच्या समितीत एकनाथ खडसे यांचा समावेश करा अशा सूचना शरद पवार यांनी समितीतील संबंधितांना दिल्याचे समोर येत आहे.