Maratha Reservation Govt Advertisement : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय घेणार निर्णय, शिंदे सरकारची 'ती' जाहिरात चर्चेत

Maratha Reservation Govt Advertisement : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय घेणार निर्णय, शिंदे सरकारची ‘ती’ जाहिरात चर्चेत

| Updated on: Oct 23, 2023 | 1:03 PM

VIDEO | मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची जाहिरात सध्या चर्चेत आली आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक होत सरकारला अल्टिमेटम दिला तरी अद्याप कोणताही तोडगा नाही, तर मराठ्यांना आश्वस्त करण्यासाठी सरकारकडून एक जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेलं अल्टिमेटम चांगलंच चर्चेत आहे. अशातच आता शिंदे फडणवीस सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध करून मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे, असं वचन आजच्या जाहिरातीतून देण्यात आलं आहे. पुन:श्च… मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधिल आहे’, असे सरकारच्या आजच्या जाहिरातीत म्हटले आहे. तर केंद्र सरकारने दिलेलं 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभार्थी महाराष्ट्रातील मराठा समाज असल्याचा दावा सरकारकडून या जाहिरातीत करण्यात आला आहे. कालच्या या जाहिरातीवर टीका झाल्यानंतर राज्य सरकारकडून आज पुन्हा नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजच्या जाहिरातीत मराठा समाजाला राज्य सरकारकडून मराठा समाजाला वचन देण्यात आलं आहे.

Published on: Oct 23, 2023 01:03 PM